CBSE Board Exam 2020 : परीक्षेच्या 2 दिवस अगोदर CBSE नं जारी केली ‘ही’ महत्वाची सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीएसई परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अशातच परीक्षेच्या अगदी दोन दिवस अगोदर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)ने ही सूचना 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी जारी केली आहे. सीबीएसईची ही सूचना, अ‍ॅन्सरशीटमध्ये रोल नंबर भरण्यासंदर्भात आहे.

नुकतेच बोर्डाने एक वेबकास्ट केले, ज्याद्वारे बोर्डाने परीक्षेचा नियम आणि निर्देशांबाबत शाळांसह विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही माहिती दिली. यासोबतच बोर्डाने अ‍ॅन्सरशीट (CBSE Board exam 2020 answer sheets) मध्ये रोल नंबर भरण्यासंदर्भात जरूरी सूचना केली आहे. सीबीएसई बोर्डाने अ‍ॅन्सरशीटमध्ये रोल नंबर कसा भरावा याबाबत सांगितले आहे.

आठ अंकी असेल रोल नंबर
पालक आणि विद्यार्थ्यांनी ही माहिती घेणे जरूरी आहे की, यावेळेला सीबीएसई बोर्डाचा रोल नंबर आठ अंकी असणार आहे. यापूर्वी रोल नंबर 7 अंकी होता.

असा भरा रोल नंबर
जेव्हा रोल नंबर, 1 ने सुरू होतो तेव्हा ग्रीड बॉक्सच्या बाहेर 1 लिहा आणि पहिल्या लाईनमध्ये 1 च्या खालील जागेला रंगवा. अशा तर्‍हेने बाकीच्या सर्व नंबरलाही करा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like