CBSE Board Exam 2020 : HRD मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली मोठी घोषणा ! विद्यार्थी आपल्याच शहरातून देऊ शकतात परीक्षा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली. त्यांनी म्हटले की, 10वी आणि 12वी इयत्तेचे ते विद्यार्थी जे लॉकडाऊनच्या दरम्यान अन्य राज्यात किंवा अन्य जिल्ह्यात गेले आहेत, ते बोर्डाची उर्वरित परीक्षा तेथेच देऊ शकतात. एचआरडी मंत्र्यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

कोविड 19 संकटामुळे हजारो मुले आपल्या मुळ गावी गेली आहेत, अशा स्थितीत सीबीएसईच्या बोर्ड परीक्षांमध्ये सहभागी होत असलेल्या विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन सीबीएससीने हा निर्णय घेतला आहे की, असे विद्यार्थी आपली बोर्ड परीक्षा आपल्या मुळ जिल्ह्यात दिऊ शकतात.

जारी झाली होती डेटशीट

कोविड-19 मुळे सीबीएसई बोर्डाच्या काही परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. नंतर उर्वरित परीक्षांचे डेटशीट जारी केल्यानंतर एचआरडी मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटले होत की, विद्यार्थी आपल्या शाळांमध्ये जेथे त्यांचे नाव आहे, तेथे परीक्षा देऊ शकतात, म्हणजे त्यांना त्याच परीक्षा केंद्रात ठेवले जाईल. नंतर अशा प्रकारच्या गोष्टी समोर येऊ लागल्या की, काही विद्यार्थी बाहेरगावी गेले आहेत, किंवा त्या शहरात हजर नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी आता केंद्रीय मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

29 मुळे विषयांची परीक्षा

यापूर्वी सीबीएसईने 10वी आणि 12वीच्या वर्गाच्या शिल्लक पेपर्ससाठी रिवाइज्ड डेटशीट जारी केली होती. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ज्या 29 मुळ विषयांची परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामध्ये उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये दहावीच्या 6 पेपरचा समावेश होता, तर देशभरात 12वी क्लासचे 12 पेपर होते. एवढेच नव्हे, उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये 12वीच्या 11 विषयांच्या सुद्धा परीक्षा आयोजित करायच्या आहेत. कोरोना व्हायरसने जगभरात आपल्या प्रकोप सुरूच ठेवला आहे. भारतात या महामारीमुळे संसर्ग झालेल्या रूग्णांचा आकडा सव्वा लाखाच्या पुढे गेला आहे.