CBSE Class 12 Board Exam 2021 : जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा, सप्टेंबरमध्ये निकाल; जाणून घ्या बोर्डाचा प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा वाढता संसर्ग पाहता अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षा 15 जुलै ते 26 ऑगस्टपर्यंत आयोजित करण्याच्या तयारीत आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे विविध राज्यांतील परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहेत. बोर्डाच्या विद्यार्थी आणि ड्यूटीमध्ये तैनात असलेल्या शिक्षकांचे लसीकरण केले जावे. तेव्हाच बोर्डाची परीक्षा आयोजित करावी, असे दिल्ली सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे.

असा आहे सीबीएसई बोर्डाचा प्लॅन…
सीबीएसई बोर्डाच्या प्लॅननुसार फक्त काही मुख्य विषयांच्या परीक्षा आयोजित कराव्यात. याशिवाय परीक्षेचा कालावधी 3 तासांऐवजी 1.5 तासांचा असावा. शिक्षणमंत्र्यांच्या या बैठकीत सर्वाधिक राज्यातील शिक्षणमंत्र्यांनी या पर्यायाचे समर्थन केले.

– 1.5 तास किंवा 90 मिनिटांचा परीक्षा पॅटर्न वेगळा असेल. यामध्ये फक्त MCQ प्रश्न असतील. परीक्षा पूर्ण करू शकेल. परीक्षा विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये भाषा विषय आणि तीन पर्यायीसाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे.

– Temporary TimeTable तयार केले गेले. ज्यानुसार, दोन टप्प्यांत 15 जुलैपासून ते 1 ऑगस्टपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यांत 6 ऑगस्टपासून ते 26 ऑगस्टपर्यंत आयोजित केली जावी. यामध्ये रविवारीही परीक्षा घेण्याचा प्रस्ताव आहे.

काय आहे प्लॅन B?
जर कोणताही विद्यार्थी कोरोनासंबंधित मुद्यावरून उपस्थित होण्यास असमर्थ असेल तर विद्यार्थ्यांना सीबीएसई परीक्षा 2021 साठी सुमारे 15 दिवसानंतर दुसरा पर्याय दिला जाऊ शकतो. सरकारकडून या पर्यायावर जून महिन्यात सविस्तर माहिती दिली जाऊ शकते.

सुरक्षेसंबंधी सर्व नियमांचे पालन केले जाईल
गेल्या वर्षीसारखी यावर्षीही CBSE बोर्ड 2021 परीक्षा कोरोना नियमावलीसह आयोजित केली जाणार आहे. परीक्षेदरम्यान सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन केले जाणार आहे. असे असले तरीही विद्यार्थी आणि शिक्षकांचा एक मोठा वर्ग सोशल मीडियावर सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 रद्द करण्याची मागणी करत आहे.

मनुष्यबळ विकासमंत्री म्हणतात…
मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले की, विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षा आणि भविष्य हे दोन्ही आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे.

रसायनशास्त्र, अकाउंटचा होणार पेपर
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, बिजनेस स्‍टडीज्, अकाउंट्स, भूगोल, अर्थशास्त्र आणि इंग्रजी विषयांचा पेपर घेतला जाणार आहे.