CBSE Board Exam 2021 : CBSE नं ‘या’ दोन विषयांच्या संदर्भात केला बदल, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( CBSE) इंग्रजी आणि संस्कृत भाषेचे दोन पेपर सादर करेल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्यासाठी सध्या बोर्ड दोन स्तरांवर गणित व हिंदी उपलब्ध करुन देते. यासह, बोर्ड पुढील शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) अंमलबजावणी अंतर्गत सुधार परीक्षा देखील सुरू करेल. दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत टप्प्याटप्प्याने पात्रता आधारित प्रश्न आधीच जाहीर केले गेले आहेत. बोर्डाने दरवर्षी प्रश्नांच्या संख्येत 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, “एनईपीच्या प्रमुख भागांचा समावेश नवीन राष्ट्रीय कॅरिक्युलम फ्रेमवर्क (एनसीएफ) आणि केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत केला जाईल. एनसीएफसाठी ग्राउंडवर्क सुरू करण्यात आले असून पुढील शैक्षणिक वर्षात 2021-22 च्या सत्रात ते विकसित होण्याची शक्यता आहे. ” NEP 2020 ची लक्ष्य व उद्दीष्टे साध्य करण्यासाठी, डीएसईएलने टास्क सूचींसह एक मसुदा अमंलबजावली योजना तयार केली आहे. ज्यामध्ये कार्ये, टाईमलाईन आणि आऊटपुट पूर्ण करण्यासाठी जबाबदार एजन्सीजमध्ये प्रत्येक शिफारशी जोडल्या गेल्या आहेत.. ही कार्य यादी अभिप्राय / सूचना देण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेश / स्वायत्त संस्थांशी सामायिक केली गेली. तज्ञ गटांद्वारे मिळालेल्या प्रतिसादाचे विश्लेषण केल्यानंतर अंमलबजावणी योजनेच्या अंतिम आवृत्तीत महत्त्वपूर्ण सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.

सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 च्या तारखा 31 डिसेंबर 2020 रोजी शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्या. सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 4 मे पासून सुरू होईल आणि 10 जून रोजी संपतील . 1 मार्चपासून प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. मात्र मंडळाने अद्याप तारखेचे पत्रक जाहीर केलेले नाही. दरम्यान, सोमवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणमंत्र्यांनी देशभरातील केंद्रीय विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जेईई, नेट 2021 अभ्यासक्रम किंवा सुधारित सीबीएसई बोर्डच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांची उत्तरे देताना शिक्षणमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांनी त्यांच्या सीबीएसई बोर्ड परिक्षेसाठी फक्त सुधारित अभ्यासक्रमासाठी अर्ज करावा लागेल.