‘CBSE’ ने 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या नव्या ‘सूचना’, जाणून घ्या ‘अन्यथा’ देता येणार नाही ‘परिक्षा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीएसईने 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांबाबत नवे नियम आणले आहेत. बोर्डाने 2020 साठी विद्यार्थ्यांच्या शाळेतील 75 टक्के उपस्थिती संबंधित नवीन नियम आणला आहे. त्यानुसार परिक्षार्थी विद्यार्थींची 75 टक्के उपस्थिती नसल्यास त्या विद्यार्थ्यांना सीबीएसई एक संधी देणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना थेट अर्ज करावा लागेल. हा अर्ज 1 ते 7 जानेवारी 2020 पर्यंत करावा लागेल. सात जानेवारी नंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

मागील अनेक वर्षांपासून दिसत आहे की विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवसेंदिवस घटत आहे. यावर बोर्डने नाराजी वर्तवली होती. परंतू आता बोर्डकडून नव्या नियमांच्या अंतर्गत अशा विद्यार्थ्यांची यादी मागवण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांकडे अर्ज मागवले आहे. हे अर्ज आल्यानंतर CBSE ठरवेल की हे विद्यार्थी अर्ज करु शकतील की नाही.

CBSC ने दिले आदेश –
– 75 टक्के उपस्थिती नसल्यास 7 जानेवारी पर्यंत अर्ज करावा लागेल.

– शाळेतील उपस्थितीची आकडेवारी 1 जानेवारीपर्यंत करण्याचा आदेश.

– विद्यार्थ्यांनी सूटीसाठी अर्ज केला असेल तर त्यांच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट घेण्यात येईल.

– कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेत सहभागी करुन घेतले जाणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –