‘CBSE’ नं वाढवली ‘फी’, परिक्षेला बसणाऱ्या ‘विद्यार्थ्यांना’ भरावी लागणार ‘दुप्पट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच CBSE ने आपल्या शुल्कात वाढ केली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात आता अधिक शुल्क भरावे लागणार आहे. १० वी आणि १२ वीचे विद्यार्थ्यी जेव्हा २०२० ला बोर्डाची परिक्षा देईल. तर त्याला त्यासाठी अधिक शुल्क भरावे लागेल. बोर्डाला विद्यार्थ्यांना पाच विषयांसाठी १५०० रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. इतर अधिक विषयांसाठी 300 रुपये अधिक शुल्क द्यावे लागेल. बोर्डाकडून लेट फी देखील आकारली जाऊ शकते.

लेट फी २००० रुपये –

सध्या CBSE कडून ९ वी, ११ वी च्या विद्यार्थ्यांना १० वी आणि १२ वी साठी नोंदणी करु शकले आहे. मागील वर्षी पाच विषयांसाठी ७५० रुपये शुल्क आणि इतर अधिक विषयांसाठी १५० रुपये अधिक शुल्क आकारण्यात येत होते. आता लेट फी २००० रुपये केली आहे आणि मायग्रेशन फी ३५० रुपये आहे.

अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१९ –

१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१९ असणार आहे. यानंतर जर कोणीही विद्यार्थी फॉर्म भरेल तर प्रति विद्यार्थी २००० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. मागील वर्षी लेट फी १००० रुपये होती. सध्या वाढवलेले शुल्क १० वी आणि १२ वीसाठी सारखी असेल. १२ वी प्रॅक्टिकल परिक्षेसाठी शुल्क ८० रुपये वाढवून १५० रुपये करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –