CBSE | सीबीएसईने 10 वी – 12 वी च्या परीक्षेबाबत घेतला मोठा निर्णय ! जारी केली नवीन मार्गदर्शकतत्त्वे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  CBSE | केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (CBSE) 10वी आणि 12वी वर्गाच्या परीक्षांबाबत नवीन गाईडलाईन (Guidelines for Class 10 And 12 Term-1 Exam) जारी केली आहे. सीबीएसईने शुक्रवारी नोटिफिकेशन जारी करून म्हटले की, 10 वीमध्ये एकुण 75 आणि 12 वीच्या वर्गात 114 विषय ऑफर केले जातात. मात्र या परीक्षा पूर्ण करण्यात 45-50 दिवसांचा वेळ लागेल. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या वेळेचे नुकसान रोखण्यासाठी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.

 

प्रारंभीची तारीख जारी

 

सीबीएसई (CBSE) भारत आणि परदेशात सर्व संबंधीत शाळांमध्ये डेटशीट ठरवून परीक्षा आयोजित करेल.
यावेळी 10 वीच्या वर्गाची परीक्षा 17 नोव्हेेंबरपासून आणि 12 वीची परीक्षा 16 नोव्हेंबरपासून (CBSE Class 10 And 12 Term-1 Exam) आयोजित केली जाईल.

 

किती विषयांची होईल परीक्षा?

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) 10 वीच्या वार्गत एकुण 75 विषय आणि 12 वी वर्गात 114 विषय ऑफर करते.
बोर्डाचे म्हणणे आहे की इतक्या जास्त विषयांच्या परीक्षा घेण्यासाठी 45 ते 50 दिवसांचा वेळ लागतो.
यासाठी स्टूंडेंटच्या अभ्यासाच्या वेळेचे नुकसान रोखण्यासाठी बोर्ड अनेक विषयाची परीक्षा ग्रुपवाईज घेईल.
केवळ प्रमुख विषयांची परीक्षा नियमित प्रकारे घेतली जाईल.

 

10 वीच्या वर्गाचे प्रमुख विषय –

 

हिंदी कोर्स ए, मॅथ्स स्टँडर्ड, होम सायन्स, हिंदी कोर्स बी, सायन्स, सोशल सायन्स, कम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन, इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर, मॅथ्स बेसिक.

 

12 वीच्या वर्गाचे प्रमुख विषय –

 

हिंदी इलेक्टिव्ह, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, सोशियोलॉजी, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिकल एज्युकेशन,
बिझनेस स्टडीज, अकाऊंटन्सी, होम सायन्स, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस (न्यू), कम्प्यूटर सायन्स (न्यू), इंग्लिश कोर, हिंदी कोर.

 

CBSE फॉर्मेटमध्ये झाले बदल

 

यावेळी CBSE च्या परीक्षा 2 वेळा केल्या जातील. या परीक्षांची पहिली टर्म नोव्हेंबर- डिसेंबर 2021 मध्ये होणार आहे तर दुसरी टर्म मार्च-एप्रिल 2022 मध्ये होणार आहे.
दोन्ही टर्मच्या परीक्षांमध्ये 50-50 % सिलॅबसमधून प्रश्न विचारले जातील. परंतु निकाल दोन्ही परीक्षांचे गुण मिळून जारी केला जाईल.

 

अशा होतील परीक्षा

 

यावेळी टर्म-1 ची परीक्षा 90 मिनिटांची आयोजित केली जाईल. जी MCQ आधारित असेल.
विद्यार्थ्यांना आपली उत्तरे OMR सीटमध्ये भरावी लागतील. तर, टर्म-2 ची परीक्षा 2 तासांची असेल.
यामध्ये वर्णनात्मक प्रश्न असतील. टर्म 2 ची प्रश्नपत्रिका वेगळ्या फॉर्मेटमध्ये असेल.
मात्र टर्म-2 मध्ये काही शॉर्ट आणि लाँग दोन्ही प्रकारचे प्रश्न असू शकतात.
दरम्यान देशात कोरोनाची स्थिती बिघडली तर या पद्धतीत बदल केला जाऊ शकतो.

 

Web Title : CBSE | cbse has released the date of term 1 examinations of 10th and 12th class first paper will be on this date

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sameer Wankhede | आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Pune Crime | पुण्यात IAS अधिकार्‍याच्या घरात ‘धाडसी’ चोरी ! लक्ष्मी पुजनासाठी ठेवलेले दीड किलो सोन्याचे दागिने लंपास; प्रचंड खळबळ

Acidity Bloating Constipation | अ‍ॅसिडिटी-बद्धकोष्ठता-डोकेदुखी, दिवाळी पार्टीनंतर होत असेल त्रास तर आराम देतील ‘या’ 5 टिप्स; जाणून घ्या