‘CBSE’ ने बदलले प्रवेशाचे ‘नियम’, जाणून घ्या काय आहेत ‘नवे’ नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) ने ९ वी आणि ११ वीत प्रवेश देण्याच्या नियमात बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार जर कोणी विद्यार्थी CBSC मध्ये प्रवेश घेऊ इच्छित असेल तर त्यांना सर्वात आधी याचे कारण सांगावे लागेल. उदाहरणार्थ काही विद्यार्थी चांगल्या शिक्षणासाठी शाळा बदलू इच्छित असतात. परंतू तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर मागील शाळेचे पाच वर्षांचा रेकॉर्ड दाखवावा लागेल याशिवाय ज्या CBSC च्या शाळेत विद्यार्थी प्रवेश घेत आहे त्यांना देखील त्यांचा मागील ५ वर्षांचे रेकॉर्ड दाखवावे लागणार आहे.

CBSE ने आपल्या सूचना पत्रात म्हणले आहे की, अनेक विद्यार्थी ९ वी आणि ११ वी दरम्यान शाळा, कॉलेज बदलतात. काही विद्यार्थी शाळा लांब असल्याचे कारण देतात तर काही जण कुटूंबाचे किंवा दुसरीकडे राहिल्या गेल्याचे कारण देतात. तर काही जण चांगले शिक्षण हवे असल्याचे सांगतात. अनेकदा विद्यार्थी तेव्हा शाळा बदलतात जेव्हा शैक्षणिक वर्ष संपणार असते.

पालकांना द्यावे लागणार कारण

विद्यार्थी जर आपल्या पालकांच्या नोकरीमुळे किंवा व्यवसायामुळे शाळा बदलत असेल तर अशा स्थितीत पालकांना अपाॅइंटमेंट लेटर बरोबर अर्ज द्यावा लागेल. ज्यावर पालकांची स्वाक्षरी देखील असेल. जर विद्यार्थी एखाद्या नातेवाईकांबरोबर शहरात शिफ्ट झाला असेल तर त्याला त्या नातेवाईकांचे फोटो देखील शाळेत द्यावे लागतील.

पालकांचा विरोध

तर दुसरीकडे पालकाचे म्हणणे आहे की सीबीएसईचे हे नियम त्यांना त्रासदायक आहेत. कारण शाळेला ऑफर लेटर देणे म्हणजे आपली खासगी माहिती शाळेला देणे. अनेक विद्यार्थी शाळेतील शिक्षकांच्या समस्येमुळे शाळा बदलतात. अशात लेखी कागदपत्रे देणे योग्य नाही असे झाल्यास विद्यार्थीना दुसऱ्या शाळेत प्रवेश कसा मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –