CBSE 10th Result : दहावीचा निकाल जाहीर ; ‘येथे’ पाहा निकाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या (सीबीएसई) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. याबाबतची अधिसूचना बोर्डानं जाहीर केली आहे.

सीबीएसईच्या दहावीच्या निकालाची तारीख लवकर अधिकृतपणे जाहीर होणार आहे. घोषणा बोर्डाकडून करण्यात आली होती. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या (सीबीएसई) बोर्डाचा १२ वीचा निकाल लागल्यानंतर दोन ते तीन दिवसांपर्यंत १० वीचा निकाल ही जाहीर करण्यात येत असतो. १२ वीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा निकाल जाहीर करण्यापूर्वी सीबीएसई बोर्डाने कोणतीही आधी सूचना न देता अचानक निकाल जाहीर केला होता.

सीबीएसईच्या दहावीच्या निकालासंदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या. काल रविवारी हा निकाल लागणार असा मेसेज सोशल मीडियातून फिरत होता. त्यामुळे पालक व विद्यार्थी संभ्रमित झाले होते. बोर्डाने याबाबत सोशल मीडियात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आव्हान सीबीएसई बोर्डाचे जनसंपर्क अधिकारी रमा शर्मा ट्विट करून यांनी केले होते.

या साईटवर करा निकाल चेक –

बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून mahahsscboard.in आणि cbse.nic.in निकाल पाहता येईल.