सीबीएससी दहावीच्या बोर्डाचा आज लागणार निकाल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी घोषणा केली. सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता.

रिलल्ट डॉट एनआयसी या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावीचे तब्बल 18 लाख विद्यार्थ्यी निकालाच्या प्रतीक्षेत होते. मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाच्या तारखेची माहिती दिली. विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमधून तसंच डिजिलॉकरमधूनही आपली गुणपत्रिका पाहता येणार आहे. माझे प्रिय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल उद्या जाहीर केले जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा, असे ट्विट त्यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. उर्वरित पेपर जुलै महिन्यात घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. परंतु विद्यार्थी आणि पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित पेपर रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. दिल्लीतील सीबीएसई विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल इंटरनल असेसमेंट, प्रोजेक्चट वर्क आणि असाईनमेंट्सच्या आधारावर जाहीर केले जाणार आहेत.