CBSE Class 12 Result | 31 जुलैपर्यंत CBSE 12 वी निकाल जाहीर होणार, सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती; जाणून घ्या फॉर्म्यूला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सीबीएसई (CBSE Evaluation 2021) 12 वी निकाल प्रकरणी नियुक्त केलेल्या 13 सदस्यीय समितीनं गुरुवारी (दि. 17) सुप्रीम कोर्टाला ( Supreme Court) आपला अहवाल सादर केला आहे. या समितीनं मार्कशीट (Marksheet) तयार करण्यावर अहवाल तयार केला आहे. सीबीएसईने (CBSE) सांगितलं की, अंतिम निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावी गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. सीबीएसीईचे निकाल (CBSE Class 12 Result) 31 जुलै रोजी जाहीर होतील. ज्या विद्यार्थ्यांना निकालावर आक्षेप असेल त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल, असं अ‍ॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल (Attorney General KK Venugopal) यांनी केंद्र सरकारच्या (Central Government) वतीने सुप्रीम कोर्टात सांगितलं.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

असा आहे फॉर्म्युला (this is the formula)

सादर केलेल्या अहवालानुसार आपला अहवाल विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन निकषांची शिफारस करण्यासाठी 30:30:40 फॉर्म्युलाच्या (Formula) बाजूने आहे.
म्हणजेच दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालास 30 टक्के वेटेज दिले जाईल.
इयत्ता 12 वीच्या पूर्व बोर्ड परीक्षेला (Board exam) 40 टक्के वेटेज दिले जाईल, असे सूत्र निकालाचे असणार आहे.

असा निकाल जाहीर होईल (this will be the process of result)

10 वीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण घेतले जातील, त्याच प्रमाणे अकरावीच्या 5 विषयांचे सरासरी गुण घेतले जातील.
12 वी पूर्व बोर्ड परीक्षा आणि प्रॅक्टिकलचे गुण (Exam and Practical Marks) घेतले जातील.
दहावीचे 30 टक्के गुण, 11वीच्या गुणातील 30 टक्के आणि 12 वीच्या 40 टक्के गुणांवर आधारित निकाल लावण्यात येईल.

 

Web Title : CBSE Class 12 Result | cbse submitted supreme court evaluation criteria results will be decided basis performance class 10 and 11 and 12

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Ministry of Defence | संरक्षण मंत्रालयात 10 वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या