CBSE Compartment Exam 2020 : सीबीएसईनं जारी केलं कम्पार्टमेंट एग्झाम शेड्यूल, सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा

नवी दिल्ली : सीबीएसईची बोर्ड कम्पार्टमेंटल परीक्षा रद्द होण्याचा अंदाज वर्तवला जात होता, परंतु अखेर सीबीएसईने कम्पार्टमेंटल एग्झामच्या शेड्यूलची घोषणा केली आहे. 10 वी आणि 12वी साठी यावर्षी परीक्षा आयोजित केली जाईल. सीबीएसई कम्पार्टमेंटल परीक्षेसाठी 13 ते 20 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्यात येतील. तर, 1 ते 15 जुलैपर्यंत परीक्षा न देणार्‍या विद्यार्थ्यांचे ऑपशनल एग्झामचे फॉर्मसुद्धा भरले जातील. वृत्तानुसार सीबीएसई बोर्ड कम्पार्टमेंटल परीक्षा सप्टेंबर महिन्यापासून सुरू केल्या जाऊ शकतात.

कोरोना काळात सीबीएसईच्या कम्पार्टमेंट परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात देशभरातील 800पेक्षा जास्त विद्यार्थी सुप्रीम कोर्टात गेले होते. दाखल याचिकांमध्ये म्हटले आहे की, अजूनपर्यंत कम्पार्टमेंट परीक्षेचे शेड्यूल ठरवलेले नाही, तसेच बहुतांश कॉलेजने एग्झाम आणि अ‍ॅडमिशनची डेडलाईन जारी केली आहे.

तर, याचिकेत सुप्रीम कोर्टाला महामारी नष्ट होईपर्यंत सीबीएसईच्या कम्पार्टमेंट परीक्षा घेण्याचा निर्णय रोखण्याची विनंती केली आहे. सीबीएसई 10वीमध्ये यावेळी 1,50,198 विद्यार्थ्यांची आणि 12वीचे 87,651 विद्यार्थ्यांची कम्पार्टमेंट आली होती. काही दिवसांपूर्वी सीबीएसईने ग्रेस मार्क्स देऊन विद्यार्थ्यांना पास करण्यास नकार दिला होता. बोर्डाने म्हटले होते की, जे विद्यार्थी एक आणि दोन विषयात फेल आहेत, त्यांना कम्पार्टमेंटल परीक्षा द्यावी लागेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like