CBSE Digilocker Marksheet | सीबीएसईने म्हटले – डिजिलॉकरवर जारी मार्कशीटला कायदेशीर मान्यता, उच्च संस्था देऊ शकत नाहीत प्रवेशाला नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CBSE Digilocker Marksheet | सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) ने अलिकडेच एक नोटीस जारी करून सर्व विद्यापीठांना सांगितले आहे की, त्यांनी डिजिलॉकर (DigiLocker) ची मार्कशीट आणि मायग्रेशन सर्टिफिकेटला (Migration Certificate) अ‍ॅडमिशनच्या वेळी मान्यता द्यावी. बोर्डाचे म्हणणे आहे की, डिजिलॉकरवर जारी डिजिटल हस्ताक्षर (Digital signature) आणि क्यूआर कोडच्या मार्कशीटला कायदेशीर मान्यता प्राप्त आहे. उच्च शिक्षण संस्था (Institutions of Higher Education) ते घेण्यास नकार देऊ शकत नाहीत आणि त्याऐवजी अ‍ॅडमिशनसाठी (Admissions) प्रिंटेड कॉपीजची मागणी करू शकत नाहीत (CBSE 12th MarkSheet, Migration Certificate in Digilocker Is Valid for Admissions 2022).

 

नंतर जमा करा प्रिंटेड कॉपीज –

बोर्डाचे म्हणणे आहे की, सर्व यूनिव्हर्सिटीज मार्कशीट आणि सर्टिफिकेटच्या प्रिंटेड कॉपीची मागणी नंतर पूर्ण करू शकतात आणि विद्यार्थ्यांना (student) नंतर ते जमा करण्यास सांगू शकतात.
परंतु, या आधारावर त्यांना अ‍ॅडमिशनसाठी नकार देता येऊ शकत नाही आणि डिजिलॉकरवर उपलब्ध मार्कशीट आणि मायग्रेशन सर्टिफिकेटच्या आधारावर उमेदवाराला अ‍ॅडमिशन घेण्याची सूट दिली जावी.
काही काळातच बोर्डाद्वारे प्रिंटेड कॉपीज जारी केल्या जातील. (CBSE Digilocker Marksheet)

 

बोर्डाने यूजीसी सचिवांना काय म्हटले –

सीबीएसईने (CBSE) नोटिसच्या माध्यमातून यूजीसी (UGC) सचिव प्रो. रजनीश जैन (Prof. Rajnish Jain)
यांना सर्व उच्च संस्थांना क्यूआर कोड आणि डिजिटल हस्ताक्षरासह कागदपत्रांची डिजिटल कॉपी स्वीकारण्याचे
निर्देश देण्याची विनंती केली.

नोटिसनुसार, काही विद्यापीठांनी (University) विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट प्रिंटेड स्वरूपात जमा करण्यास सांगितले आणि बोर्डाने एचईआयला डिजिटल कागदपत्र स्वीकारण्याचे आवाहन केले.
सीबीएसईने सांगितले की, विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपात जारी डिजिटल मार्कशीट कम पासिंग सर्टिफिकेट
आणि मायग्रेशन सर्टिफिकेट परीक्षा नियंत्रकांद्वारे कायदेशीर हस्ताक्षर केलेले आहे आणि मान्य आहे.

 

लवकरच जारी होतील प्रिंटेड सर्टिफिकेट –

सीबीएसई इयत्ता 12 वीचा रिझल्ट 22 जुलै, 2022 ला जारी झाला होता. केंद्रीय बोर्ड काही कालावधीत सीबीएसई 12 वीची मार्कशीट (CBSE 12th Marksheet) आणि मायग्रेशन सर्टिफिकेटची प्रिंटेड कॉपी जारी करेल.
तोपर्यंत उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी डिजिलॉकरवर उपलब्ध आपल्या डिजिटल कागदपत्रांचा वापर करू शकतात.

 

Web Title : –  CBSE Digilocker Marksheet | cbse mark sheets migration certificates for class 12th in digilocker valid for admission in colleges know details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा