CBSE : सीबीएसई 9 वी, 10 वी, 11 वी आणि 12 वी च्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये झाला बदल, आता येतील अशाप्रकारचे प्रश्न, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) द्वारे सत्र 2021-22 पासून 9वी ते 12वीच्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला आहे. हा बदल याच सत्रात लागू होईल. याची माहिती सर्व शाळांना पाठवण्यात आली आहे. बोर्डानुसार, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आता लघु आणि दीर्घ उत्तरांचे प्रश्न 10 टक्के कमी विचारले जातील. अजूनपर्यंत 10 वी मध्ये लघु आणि दीर्घ उत्तरांचे पश्न 70 टक्के विचारले जात होते. तर 12वीत 60 टक्के लघु आणि दीर्घ उत्तरांचे प्रश्न असत. परंतु बोर्डाने 10 टक्के कमी केले आहेत.

तर 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेत क्षमता आधारित प्रश्नांचा समावेश केला जाईल. नवीन शिक्षण धोरण 2020च्या अंतर्गत बोर्डाद्वारे हा बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता वाढावी, यासाठी आता नववी आणि 11वीच्या वार्षिक परीक्षा आणि बोर्ड परीक्षेत क्षमता आधारित प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. यामध्ये नववी आणि दहावी बोर्डात 30 टक्के आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षेत 20 टक्के क्षमतावाले प्रश्न असतील. अजूनपर्यंत क्षमता आधारित प्रश्न विचारले जात नव्हते.

– नव्या पॅटर्नवर जारी होणार सॅम्पल पेपर
बोर्डाचे अकॅडेमिक डायरेक्टर डॉ. जोसफ इमॅनुअल यांच्यानुसार, बदललेल्या नव्या पॅटर्नवर सॅम्पल पेपर जारी होईल. याच पॅटर्नवर आता शाळांना शिकवण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत. यातून विद्यार्थ्यांना आतापासून याची माहिती होईल.

9 वी आणि 10 वीमध्ये
– क्षमता आधारित प्रश्न 30 टक्के असणार (यामध्ये मल्टीपल चॉईस, केस स्टडी, इंटीग्रेटेड इत्यादी प्रकारचे प्रश्न असणार)
– 20 गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न असेल
– लघु आणि दीर्घ उत्तरांचे प्रश्न 60 टक्केवरून कमी करून आता 50 टक्के विचारले जातील.

11वी आणि 12वीत
– क्षमता आधारित 20 टक्के प्रश्न असणार (यामध्ये केस स्टडी, मल्टीपल चॉईस, इंटीग्रेटेड प्रकारचे प्रश्न असणार)
– 20 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार
– लघु आणि दीर्घ उत्तरांचे प्रश्न आता 70 टक्क्यावरून कमी करून 60 टक्के करण्यात आले आहेत.