CBSE Exam Result 2021 | केंद्रीय शिक्षण मंत्री निशंक म्हणाले – ‘CBSE रिझल्टबाबत असमाधानी विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये मिळेल परीक्षा देण्याची संधी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) – केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक (Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank) यांनी शुक्रवारी सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) विद्यार्थ्यांना विश्वास देत म्हटले की, कोणत्याही विद्यार्थ्याच्या पात्रतेवर अन्याय होणार नाही. सीबीएसईच्या मूल्यांकन पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार निकाल मिळेल. जे विद्यार्थी सीबीएसई  मूल्यांकन पद्धतीने काढलेल्या (CBSE Exam Result 2021) निकालावर असामाधानी असतील त्यांच्याकडे स्थिती ठिक झाल्यानंतर परीक्षा देण्याचा पर्याय असेल. ही वैकल्पिक परीक्षा ऑगस्टमध्ये होऊ शकते.  CBSE Exam Result 2021 | central education minister on cbse exam live updates nishank will address students concerns on cbse 10th 12th exams result criteria marking scheme

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सोशल मीडियावर जारी मेसेजमध्ये त्यांनी म्हटले की, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि हित लक्षात घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्यांचा मी आभारी आहे. मी सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) सुद्धा आभारी आहे की त्यांनी आपला निर्णय सीबीएसईच्या प्रस्तावानुसार दिला आहे.

मात्र, सीबीएसई 12वी निकालाच्या फॉर्म्युलाबाबत अनेक विद्यार्थी आणि पालक नाराज आहेत.
काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, 10वीत मिळालेल्या गुणांना 12वीच्या निकालासाठी आधार मानू नये.
10वीच्या गुणांचा परिणाम 12वीच्या कामगिरीवर पडत नाही.
काही विद्यार्थ्यांनी हे सुद्धा म्हटले की, 11वीमध्ये नवीन विषय असल्याने त्यांना ते समजण्यास खुप वेळ लागला होता.
11वीमध्ये ते गंभीर नव्हते. यासाठी 11वीचे मार्क्स 12वीमध्ये जोडणे चुकीचे आहे.

सीबीएसई 12वीच्या निकालाचा फॉम्युला
1)
इयत्ता 12वी – युनिट टेस्ट, मिड टर्म आणि प्री-बोर्ड एग्झामच्या परफॉर्मन्सच्या आधारावर मार्क्स मिळतील. याचे वेटेज 40 टक्के असेल.

2) इयत्ता 11वी – फायनल एग्झाममध्ये सर्व विषयांच्या थेअरी पेपरच्या परफॉर्मन्सच्या आधारावर मार्क्स मिळतील. याचे वेटेज 30 टक्के असेल.

3) इयत्ता 10वी – प्रमुख 5 विषयांपैकी तीन विषयांच्या थेअरी पेपरच्या परफॉर्मन्सच्या आधारावर मार्क्स मिळतील. पाचपैकी तीन विषय ते असतील ज्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली असेल. याचे वेटेज सुद्धा 30 टक्के असेल.

Web Title :-  CBSE Exam Result 2021 | central education minister on cbse exam live updates nishank will address students concerns on cbse 10th 12th exams result criteria marking scheme

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा