१० वी आणि १२ वीची परीक्षा आणखी सोपी होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. परिक्षेच्या दृष्टीने विद्यार्थी आणि पालकांना सीबीएसईने एक मोठी खूशखबर दिली आहे. यावर्षी सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काही प्रमाणात बदलण्यात आले आहे. त्यामुळे सीबीएसईचे यावर्षीचे पेपर गतवर्षांच्या तुलनेत काही प्रमाणात सोपे असणार आहेत.

प्रश्नपत्रिकेत करण्यात आलेले महत्वाचे बदल
सीबीएसईच्या यावर्षीच्या परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या प्रश्नांची संख्या वाढवण्यात आली आहे. याशिवाय प्रश्नांबाबतचे पर्यायही वाढवण्यात आले आहेत. ”दरवर्षी परीक्षेमध्ये १० टक्के प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात. पण यावर्षी मात्र २५ टक्के प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतील. तसेच विद्यार्थी एखाद्या प्रश्नाबाबत पूर्णपणे आश्वस्त नसतील तर त्यांच्यासाठी ३३ टक्के पर्यायी प्रश्न उपलब्ध असतील.

यावेळी विद्यार्थ्यांना एक प्रश्नपत्रिका मिळणार आहे. त्यात सर्व प्रश्न विविध उपविभागात विभागलेले असतील. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न एकाच विभागात असतील. त्यानंतर अधिक गुण असलेले प्रश्न असतील.