CBSE : ‘मार्कशीट’ वर नाही लिहीलेलं असणार आता ‘नापास’ अथवा ‘कंपार्टमेंट’, परीक्षा केंद्रापर्यंत पोहचवेल ‘मोबाइल App’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीएसई बोर्डाने परीक्षेत नापास तसेच कंपार्टमेंट विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर यापुढे नापास किंवा कंपार्टमेंट लिहिले जाणार नाही. अपयशी ठरलेल्या उमेदवारांचे मनोबल कमी होऊ नये, यासाठी बोर्डाने हे पाऊल उचलल्याचे समजते. यासंदर्भात, शाळांच्या मुख्याध्यापकांकडून या शब्दांच्या जागी कोणते शब्द वापरावे, अशा सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कंपार्टमेंटच्या जागी सप्लीमेंट्री परीक्षा असे लिहिले जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच कंपार्टमेंटल परीक्षेला सेकंड परीक्षा किंवा विशेष परीक्षेचे नाव दिले जाऊ शकते.

सीबीएसई परीक्षेत दोन विषयांत नापास झालेल्यांना कंपार्टमेंटल परीक्षेस हजर राहावे लागते. सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज म्हणाले की, असे काही शब्द आहेत जे नकारात्मक वाटतात, जयचा परिणाम मुलांवर होतो. या प्रकरणी मार्कशीट बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच वर्षापासून हे शब्द बोर्डाच्या मार्कशीटमधून काढले जातील.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहोचवणार मोबाइल अ‍ॅप
सीबीएसईने दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एग्जाम सेंटर लोकेटर एप्लीकेशन जारी केले आहे. हे एप्लिकेशन रोल नंबर व क्लास फीडवरील उमेदवारांना परीक्षा केंद्राची संपूर्ण माहिती प्रदान करेल. एवढेच नव्हे, जर उमेदवारासाठी शहर नवीन असेल तर संबंधित ठिकाण आणि तेथे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ देखील सांगेल.

यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा सेंटर लोकेटर सीबीएसई ईसीएल एप्लीकेशन डाउनलोड करावा लागणार आहे. यासाठी उमेदवाराला त्याचा मोबाइल नंबर आणि एक ई – मेल विचारला जाईल. त्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकताच ऍप्लिकेशन कार्य करण्यास सुरवात करेल. ज्यामध्ये विद्यार्थ्यास परीक्षा आणि रोल क्र. विचारला जाईल. हे भरल्यानंतर, विद्यार्थ्याला बोर्डाने दिलेल्या परीक्षा केंद्राचा फोटो, नकाशा, तसेच रस्ता आणि केंद्रावर पोचण्यासाठी घेतलेल्या वेळेचा तपशील मिळेल. पालक व परीक्षकांच्या अडचणी दूर व्हाव्यात या उद्देशाने मंडळाने हे विशेष ऍप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे.

दरम्यान सीबीएसईच्या या दोन वर्गांच्या परीक्षांसाठी शिमला येथे 16 परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. कोणत्याही उमेदवाराला त्याच्या शाळेत परीक्षा केंद्र देण्यात आले नाही. म्हणूनच, येथे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे मोबाईल ऍप्लिकेशन केंद्र शोधण्याठी उपयुक्त ठरू शकते.