CBSE चा विद्यार्थी निघाला दरोडेखोर, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर शहरातील गोपाळपूर परिसरमध्ये एकाच दिवशी आठ घरफोडीचे प्रकरणे घडली होती. या गुन्ह्याचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले असून एका सीबीएसईच्या विद्यार्थ्याला याप्रकरणी अटक करून त्याच्या इतर साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाख रुपयांचं 20 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.

निलेश हनुमंत भोसले, शोएब अख्तर नदाफ, मुन्ना भिमराव मागाडे, अविनाश रेखिराम वाघमारे आणि सीबीएसीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीने आत्तापर्यंत आठ ठिकाणी घरफोड्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पंढरपूर शहरात काही दिवसांपूर्वी घरफोडी आणि चोरीच्या घटना वाढल्या होत्या. अशातच सोमवारी गोपाळपूर परिसरात एकाच दिवशी आठ घरफोडीचे प्रकरणे घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, गोपाळपूर येथे घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी एका सीबीएसईच्या विद्यार्थ्यासहीत घरफोडी करणारे अट्टल चोरटे जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून दहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि उप अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like