CBSE : 9 वी आणि 11 वी मधील विद्यार्थ्यांना ‘नापास’ झाल्यानंतर पुन्हा एक संधी मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ९ वी आणि ११ वी मध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पास होण्याची संधी देणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांमधील वाढता ताण लक्षात घेत सीबीएसईने हा निर्णय घेतला आहे.

सीबीएसईच्या ताज्या अधिसूचनेनुसार, ९ वी किंवा ११ वी मध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शाळा आणखी एकदा परीक्षा घेऊ शकतात. ही चाचणी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ऑनलाईन व ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे केली जाईल. ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल त्या विषयाची परीक्षा घेण्याअगोदर नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल.

केवळ यावर्षीच मिळणार पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी सीबीएसईने म्हटले की, सध्याच्या नाजूक परिस्थितीमुळे परीक्षेत उत्तीर्ण होण्याची आणखी एक संधी केवळ यावर्षीच दिली जाईल.