CBSE Term 1 Board Exam Dates | सीबीएसई इयत्ता 10, 12वी बोर्ड टर्म 1 परीक्षेचे वेळापत्रक 18 ऑक्टोबरला होणार जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CBSE Term 1 Board Exam Dates | सीबीएसई इयत्ता 10, 12वी टर्म 1 बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक 18 ऑक्टोबरला जारी केले जाईल. बोर्डाने म्हटले की, ही परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये आयोजित केली जाईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (CBSE) गुरुवारी म्हटले की, इयत्ता 10, 12वीच्या टर्म 1 बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक 18 ऑक्टोंबरला जारी केले जाईल. अगोदर छोट्या विषयांची परीक्षा होईल, त्यानंतर प्रमुख विषयांची परीक्षा आयोजित केली जाईल. (CBSE Term 1 Board Exam Dates)

 

सकाळी 11.30 वाजता सुरू होईल Exam
बोर्डाने म्हटले की, सर्व परीक्षा ऑफलाइन होतील. टर्म 1 ची प्रत्येक परीक्षा 90 मिनिटांच्या कालावधीची असेल. हिवाळी सत्र लक्षात घेता परीक्षा सकाळी 10.30 वाजता ऐवजी 11.30 वाजता सुरू होईल. सर्व श्रेणीच्या उमेदवारांसाठी वाचण्याची वेळ 15 मिनिटांऐवजी 20 मिनिटे असेल.

 

अंतिम निकाल दुसर्‍या सत्राच्या परीक्षेनंतर
प्रॅक्टिकल परीक्षा टर्म परीक्षा संपण्यापूर्वी आयोजित केल्या जातील. इयत्ता 10, 12 चे अंतिम निकाल दुसर्‍या सत्राच्या परीक्षेनंतर जाहीर केले जातील. यावर्षी, बोर्डाने प्रत्येक सत्रात जवळपास 50% अभ्यासक्रमासह शैक्षणिक सत्र दोन भागात विभाजित केले आहे.

बोर्डाने जुलैमध्ये म्हटले होते की, शैक्षणिक सत्राच्या अखेरीस बोर्डाद्वारे दहावी आणि बारावीची परीक्षा आयोजित करण्याची शक्यता वाढवण्यासाठी केले गेले आहे.

दोन भागात परीक्षा, 50-50 कोर्स कव्हर
कोरोना महामारी पाहता CBSE ने यावर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षा 2 भागात विभागल्या आहेत. प्रत्येक परीक्षेत 50 टक्के अभ्यासक्रम कव्हर केला आहे.

अगोदर जारी अधिसूचनेनुसार, इयत्ता 10 आणि 12 साठी टर्म 1 ची परीक्षा 15 नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर टर्म 2 मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित केली जाईल.

 

असे असेल परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप
टर्म 1 परीक्षा एमसीक्यू प्रारूपात आयोजित केली जाईल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ओएमआर शीट भरण्यासाठी सांगण्यात येईल.
तर टर्म 2 परीक्षेत केस-आधारित, स्थिती-आधारित, ओपन-एंडेड प्रश्न असतील.

 

अंतिम निकाल असा होईल तयार
टर्म 1 आणि टर्म 2 च्या गुणांच्या आधारावर फायनल निकाल तयार केला जाईल.
टर्म 1 च्या प्रॅक्टिकल शाळांद्वारे संचालित केले जाईल.
तर कोविडची स्थिती आणि लसीकरण अभियानाच्या आधारवर टर्म 2 चे संचालन सीबीएसई द्वारे केले जाईल.

Web Title :- CBSE Term 1 Board Exam Dates | cbse term 1 board exam dates cbse class 10 12th term 1 board exam date will be announced on 18 october

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | परस्पर फ्लॅट विकून महिलेची 18 लाखाची फसवणूक, ओरिएंट शिवम डेव्हलपर्ससह 5 जणांवर FIR

Pune Crime | पुण्यातील उच्चशिक्षित तरुणीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओ क्लिप केली व्हायरल

Mahapour Chashak | महापौर चषक स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट, स्पर्धेेच्या मान्यतेस वित्तीय समितीचा नकार

Pune News | पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला अडथळा ठरणारा लकडी पूलावरील मेट्रो पूलाबाबत मध्यम मार्ग काढणारच – आबा बागूल

Post Office Schemes | दररोज 150 रुपयांच्या सेव्हिंगने बनवू शकता 15 लाखापर्यंतचा फंड; Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक

Foods for Vitamin C Deficiency | ‘व्हिटॅमिन सी’च्या कमतरतेमुळे होऊ शकतो ‘हा’ भयंकर आजार, बचावासाठी सेवन करा ‘हे’ 8 फूड