CBSE नं 2020-21 सत्राच्या 9 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमामध्ये 30 % अभ्यासक्रम केला कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीएसईने 2020-21 सत्राच्या 9 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील आणि जगातील सध्याची असाधारण परिस्थिती लक्षात घेऊन, सीबएसईला नववी ते 12 इयत्तेपर्यंतच्या अभ्यासक्रम कमी करण्याचा सल्ला दिला होता, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी सांगितले. अभ्यासक्रम कितपत कमी करण्यात आलाय, तो शिक्षकांना विद्यार्थ्याना समजावून सांगावा लागेल.

अभ्यासक्रम कमी करण्या संदर्भात देशभरातील शिक्षण तज्ज्ञांकडून 1500 सल्ले मिळाल्याचे पोखरीयाल यांनी सांगितले. यापूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी एप्रिल महिन्यात अशीच योजना तयार केली होती. सिसोदीया यांनी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडे यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची शिफारस केली होती.

मार्च महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन सुरु झालं. देशात आता अनलॉक 2 सुरु आहे. पण शाळा, कॉलेज, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजूनही सुरु झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे अभ्यासाचे दिवस वाया जात आहेत. प्रत्यक्ष शाळेऐवजी ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत आहे.