ICC World Cup 2019 : भारताचा ‘हा’ हुकुमी एक्का देणार भारताला वर्ल्डकप जिंकून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम ११ पॉईंट्स मिळवत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर १० पॉईंट्स मिळवत ऑस्ट्रेलिया आहे. टीम इंडिया ९ पॉईंट्नी तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लड आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारत ज्या प्रकारे खेळत आहे आणि सध्या भारतीय संघाचा फॉर्म बघता या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे.

कर्णधार विराट कोहली आणि त्याचे शिलेदार या स्पर्धेत या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. हि स्पर्धा आता मध्यावर आली असून त्यामुळे गुणतालिकेत सर्वात वर असलेले चार संघच सेमीफायनलमध्ये जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे. भारताने या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया,पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा पराभव केला असून भारतीय संघ खेळाच्या तीनही स्तरावर उत्तम कामगिरी करत आहे. इतर संघाच्या तुलनेत भारतीय संघाने कमी सामने खेळले असून भारतीय संघाचे आणखी पाच सामने बाकी आहेत. त्यामुळे भारतीय संघाला गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहण्याची संधी आहे.

याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने एक दावा केला आहे. भारतीय संघाला विराट कोहली किंवा रोहित शर्मा भारताला वर्ल्ड कप जिंकून देणार नाही तर, भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमरा वर्ल्ड कप जिंकून देणार आहे. त्याने बुमराचे कौतुक करताना म्हटले कि, भारताच्या वर्ल्डकप विजयाची चावी बुमराकडे आहे. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता तोच भारताला हि स्पर्धा जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावू शकतो. बुमराच्या गोलंदाजीमध्ये वैविध्य असून त्याच्याकडे कौशल्य आहे,त्यामुळे तोच भारताला हि स्पर्धा जिंकून देऊ शकतो.त्याचबरोबर त्याने कर्णधार विराट कोहलीचे देखील कौतुक केले.

दरम्यान, बुमराने आतापर्यंत या स्पर्धेत ५ सामने खेळले असून त्याच्याकडे टॅलेंट आहे. बुमरा हा जगातील सर्वात खतरनाक गोलंदाज असून तो “नव्या चेंडूनं स्विंग आणि सीम दोन्ही करतो. तसेच, तो फलंदाजांवर दबावही टाकू शकतो. १५० च्या गतीनं तो गोलंदाजी करतो. यॉर्कर हे त्याचे प्रमुख अस्त्र आहे”. त्यामुळे इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा असल्याचे देखील त्याने म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’