home page top 1

क्रिकेटचा समावेश ‘ऑलिम्पिक’ आणि ‘राष्ट्रकुल’ मध्ये, ICC ने दिली ‘डेडलाईन’

दुबई : वृत्तसंस्था – क्रिकेटचा ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश होण्याच्या चर्चा बऱ्याचदा होत असतात. आता यासंदर्भात आयसीसी महत्त्वपूर्ण घोषणा करण्याच्या तयारीत असून २०२८ मध्ये लॉस एंजिलेस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार आहे. मेरिलबोन क्रिकेट क्लब या समितीचे संचालक माईक गॅटिंग तसेच आयसीसीच्या मुख्य अधिकाऱ्यांनीही यासंदर्भात ताहिती दिली.

यासंदर्भात इएसपीएन क्रिकइन्फो कडून मिळालेल्या माहितीनुसार आयसीसीचे मुख्य अधिकारी आणि गॅटिंग यांच्यात लवकरच या विषयावर चर्चा होणार असून त्यानंर ऑलिम्पिक २०२८ मध्ये क्रिकेटचा समावेश होणार की नाही हि बाब स्पष्ट होणार आहे. लॉर्ड्स येथे झालेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी २०२८ मध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयसीसी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. भारताचे क्रेंद्रिय क्रीडा सचिव राधेश्याम जुलानिया यांनी बीसीसीआयने नाडामध्ये यावे असे सांगितल्यानंतर बीसीसीआयने ही गोष्ट मान्य केल्याच्या निर्णयाचे देखोल त्यांनी स्वागत केले आहे.

राष्ट्रकुल मध्येही असणार क्रिकेट :
२०२२ मध्ये होणार असलेल्या बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटला सामील करण्याची घोषणा नुकतीच झाली. येत्या २-३ दिवसांत याविषयी अधिकृत निर्णय होणार असून तसे झाल्यास १९९८ नंतर पहिल्यांदा राष्ट्रीकूल मध्ये क्रिकेटची स्पर्धा होईल.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like