बीयरच्या किमतींमध्ये होते फिक्सिंग ! 11 वर्षापासून जास्त पैसे मोजत आहेत पिणारे

नवी दिल्ली : अंतरराष्ट्रीय बीयर कंपन्या Carlsberg, SABMiller आणि भारतीय कंपनी United Breweries फिक्सिंग करून भारतात 11 वर्षापर्यंत बीयरच्या किमतीत मनमानी करत असल्याचा मोठा खुलासा झाला आहे. भारतीय स्पर्धा आयोग (CCI) च्या एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या कंपन्यांच्या टॉप अधिकार्‍यांनी व्यवसायाच्या दृष्टीने संवेदनशील माहिती दिली आणि आपसात संगनमत करून 11 वर्षापर्यंत देशात बीयरच्या किंमती फिक्स केल्या. रॉयटर्सने दावा केला आहे की, त्यांनी सीसीआयचा रिपोर्ट पाहिला आहे. मात्र, अजूनही यावर सीसीआयचा कोणताही आदेश आलेला नाही आणि सीसीआयचे वरिष्ठ अधिकारी यावर निर्णय घेतील.

रिपोर्टनुसार 2007 ते 2018 च्या दरम्यान फिक्सिंग करण्यात आले. सीसीआयच्या 248 पानांच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ब्रूअर्सने एकत्रितपणे सरकारी मशीनरीचा दुरुपयोग केला आणि त्यांना हे चांगले माहित होते की, त्यांच्या या सामुहिक प्रयत्नाने स्पर्धा कायद्याचे उल्लंघन होत आहे.

88 टक्के भागीदारी
सीसीआयने 2018 मध्ये या तीन बीयर कंपन्यांच्या ठिकाणांवर छापा मारला होता आणि तपास सुरू केला होता. या चौकशीत या कंपन्यावर बोट ठेवण्यात आले आहे. भारताच्या सुमारे 52 हजार कोटी रुपयांच्या बीयर बाजारात यांची भागीदारी 88 टक्के आहे.

होऊ शकतो मोठा दंड
सूत्रांच्या माहितीनुसार, हा रिपोर्ट मार्चमध्ये ड्राफ्ट करण्यात आला होता. आता सीसीआयचे सीनियर मेंबर यावर विचार करतील आणि कंपन्यांवर 25 कोटी डॉलरपेक्षा जास्त दंड लावू शकतात.

या कंपन्यांच्या अधिकार्‍यांची चर्चा, व्हॉट्सअप मॅसेज आणि ई-मेलला सीसीआयने रिपोर्टमध्ये सामविष्ट केले आहे. यावरून समजते की, या कंपन्या आपसात संगनमत करून अनेक राज्यांमध्ये किंमती वाढवण्यासाठी रणनीती बनवत होत्या. या कंपन्यांनी All India Brewers Association (AIBA) चा कॉमन प्लेटफॉर्म प्रमाणे वापर केला आणि आपसात संगनमत करून किंमती ठरवल्या. नंतर एआयबीएने किंमती वाढवण्यासाठी या कंपन्यांकडून लॉबिंग केले.