पोलीस पाटलाच्या खूनाचा थरार सीसीटीव्हीत कैद

लातूर : पोलीसनामा आॅनलाइन – पोलीस पाटील साहेबराव गुंडेराव मुस्कावाड (३६ ) यांचा उदगिरमधील एका बीअरबारमध्ये खून करण्यात आला. रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी त्यांना ठार मारत असल्याचा थरार येथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. साहेबराव मुस्कावाड हे उदगीर तालुक्यातील आवलकोंडा येथील रहिवाशी होते.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, बीदर रोडवरील हॉटेल गोपाळ बारमध्ये रात्री ८: १५ वाजताच्या सुमारास आवलकोंडा येथील पोलीस पाटील साहेबराव गुंडेराव मुस्कावाड यांना काहीजणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य चित्रित झाल्याने पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे. पोलीस पाटलाचा खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. फरार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लातूर : लहान भाऊ व बहिणीस जीवे मारण्याची धमकी देऊन एका पंधरावर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना लातूरमधील चाकूर तालुक्यातील एका गावात घडली आहे. पीडित मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर चालक असलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेले पीडित मुलीचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. साधारण ९ महिन्यांपूर्वी पीडित मुलीचे कुटुंब मजुरीनिमित्त बाहेरगावी गेले होते. यावेळी चालक माजीद पठाण या आरोपीने तिच्या घरी तिच्यावर बलात्कार केला आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझा लहान भाऊ आणि बहिणीस जीवे मारू, अशी धमकी दिली. यात पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिने नुकतेच एका बाळाला जन्म दिला.