सरन्यायाधिशांवर आरोप करणाऱ्या महिलेचा भक्कम पुरावा असल्याचा दावा ; आयबी प्रमुखांना भेटू देण्याची मागणी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने मोठा गौप्यस्फोट केला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात भक्कम पुरावा असून देशाच्या तपास संस्थांच्या प्रमुखांना भेटून ते देणार असल्याचा दावा तिच्या वकीलांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांच्याच कार्यालयात काम करत असलेल्या एका महिलेने केला आहे. याप्रकऱणी सर्वोच्च न्यायालयाने इन हाऊस पध्दतीने चौकशी करण्याचे ठरविले आहे.

त्यासाठी न्या. शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली त्याच न्यायालयाच्या ३ न्यायाधिशांची चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. दरम्यान महिलेचा जामीन रद्द करण्याच्या अर्जावर ३ मे रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.