खळबळजनक ! कपड्याच्या दुकानात महिलांच्या ‘ट्रायल रूम’मध्ये छुपा कॅमेरा, कपडे बदलतानाचे ‘रेकॉर्डिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील ग्रेटर कैलाशमधील कपड्यांच्या दुकानात महिलांच्या प्रायव्हसीला छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. दिल्ली येथील रहिवासी मुलीने या दुकानातील ऑपरेटरविरूद्ध एफआयआर दाखल केला होता. ज्यामध्ये तिने ट्रायल रूममध्ये कॅमेरा असल्याचे बोलले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज  काढले तेंव्हा अनेक महिलांचे फुटेज बाहेर आले.

दुकान चालकांनी ट्रायलरुमध्ये गुप्तपणे सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा आरोप या महिलेने एफआयआरमध्ये केला आहे. ज्यामध्ये कपडे बदलणाऱ्या महिला स्पष्ट दिसल्या आहेत. सध्या पोलिसांनी डीव्हीआर जप्त करून दुकान मालकाविरूद्ध कारवाई सुरू केली आहे.

दुकानदाराने मात्र ती युवती चुकीच्या खोलीत गेल्याचे सांगितले आहे. दुकानदाराचे म्हणणे होते की ती युवती स्टोअररुमध्ये गेली होती. पोलिसांनी मात्र पूर्ण दुकानाची झाडाझडती घेत तपास सुरु केला आहे.

You might also like