एकाच रूळावर धावत होत्या 2 रेल्वे, ‘समोरा-समोर’ टक्कर झाल्यानंतर हवेत उडाले डब्बे, CCTV कॅमेर्‍यात ‘कैद’ झाली घटना (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबाद मधील काचीगुडा रेल्वे स्टेशनवर काल दोन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळून अपघात झाला. या घटनेत चालकासह 16 जण जखमी झाले असून या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये अपघाताची तीव्रता मोठी जाणवत असून हे पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल.

काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये –

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, दोन्ही रेल्वे एकाच रुळावर आलेल्या आहेत. त्यानंतर त्यांची भयंकर धडक झाली. ट्रेनचे डब्बे मोठ्या प्रमाणात हवेत उडालेले या व्हिडिओत दिसून येत असून एका गाडीचे सहा डब्बे अपघातग्रस्त झाले असून दुसऱ्या गाडीचे तीन डब्बे अपघातग्रस्त झाले आहेत. अपघातातील 16 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

चालक जखमी –

सकाळी 10 वाजून 41 मिनिटांनी लिंगमपल्ली-फलकनुमा मल्टी मोडल ट्रांसपोर्ट सिस्टम हि गाडी कुर्नूल -सिकंदराबाद रेल्वे इंटरसिटी एक्सप्रेसवर धडकली. यामध्ये 16 प्रवासी जखमी झाले असून रेल्वे चालक देखील यामध्ये जखमी झाले आहेत. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

अनेक गाड्या रद्द –

रेल्वे मंत्रालयाने किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना 5000 रुपये तर गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना 25000 रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर या अपघातामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या असून अनेक गाड्यांचे मार्ग देखील बदलावे लागले आहेत.

Visit : Policenama.com