‘इफ्तार’साठी फळ खरेदी करण्यासाठी गेला युवक, ट्रकच्या खाली झोपून केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला आरामात उभी होती, त्यावेळी तेथून ट्रक बाहेर पडला जो थोडासा पुढे जाऊन थांबला. तो माणूस ट्रकच्या दिशेने चालत ट्रक जवळ जाऊन पोहोचला आणि चाकाच्या खाली आपली मान ठेवली. तेव्हा ट्रक पुढे सरकला आणि त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. लोक आधी हा अपघात मानत होते परंतु सीसीटीव्ही फुटेजनंतर समजले की ही आत्महत्या आहे. ही आश्चर्यकारक घटना उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील आहे.

काशीपूरच्या महेश पुरा मोहल्ला येथे राहणारा इश्तियाक हुसेन शनिवारी पाकच्या रमजान महिन्यात रोजा इफ्ताररीसाठी फळ घेण्यासाठी टांडा तिराहा येथे गेला होता. यावेळी ट्रकच्या खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात मृतांचे नातेवाईक ट्रकचालकावर खून केल्याचा आरोप करीत होते, तर पोलिसही या प्रकरणाचा अपघात असल्याचे मानत होते.

रविवारी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण घटना उलगडली. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या फुटेजवरून हे स्पष्ट झाले की, मृत तरुण इश्तियाक हुसेन याने ट्रकच्या खाली येऊन आत्महत्या केली. सीसीटीव्ही फुटेज आल्यानंतर पोलिसांनी त्यांची कार्यवाही सुरू केली आहे. काशीपूरचे एएसपी राजेश भट्ट म्हणाले की, पूर्वी पोलिस या घटनेला केवळ अपघात असल्याचे मानत होते, परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या छायाचित्रांमुळे घटनेचे संपूर्ण सत्य समोर आले आहे. चौकशी दरम्यान नवरा – बायकांच्या भांडणामुळे मृत इश्तियाक नैराश्यात गेल्याचे निष्पन्न झाले आहे. आत्महत्येमागील हे कारण असू शकते.