CDS Bipin Rawat | बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर नेमकं कसं कोसळलं? अखेर सत्य आलं समोर!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. डिसेंबरमध्ये झालेल्या या दुर्घटनेत सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्यासह लष्करातील 14 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. अगदी पंतप्रधान मोदींपासून (PM Narendra Modi) ते सर्वसामान्य माणसांपर्यंत संपूर्ण देशवासीयांनी या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त केली होती. परंतु, अति महत्त्वाच्या पदावर असलेल्या बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर नेमके कशामुळे क्रॅश (Helicopter Crash) झाले, याचा तपास करण्यासठी एक समिती गठित करण्यात आली होती. त्यांच्या तपासात मोठा खुलासा झाले असून मोठे आणि महत्त्वाचे कारण समोर आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, एअर मार्शल मानवेंद्र सिंह समितीने (Air Marshal Manvendra Singh Committee) या घटनेची संपूर्ण चौकशी (Inquiry) केली आहे. कायदेशीर सल्ला (Legal Advice) घेण्यासाठी कायदा विभागाकडे पाठवले आहे. लवकरच यासंदर्भातील अहवाल वायुसेना प्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे (Weather) क्रॅश झाल्याचे समितीच्या चौकशीतून समोर आल्याचे सांगितले जात आहे.

 

खराब हवामानामुळे वैमानिक ‘विचलित’ झाले असावेत
वायुसेनेच्या (Air Force) वतीने या अहवालाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर क्रॅशच्या कराणांचा तपास करत असलेल्या समितीने अहवालात म्हटले आहे की, खराब हवामानामुळे वैमानिक (Pilot) विचलित झाले असावे, यामुळे हा अपघात झाला. तांत्रिक भाषेत त्याला CFIT म्हणजेच Controlled Flight Into Terrain असे म्हटले जाते, असे सांगितले जात आहे. हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयाने (Defense Ministry) अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.

8 डिसेंबर रोजी झाली होती दुर्घटना
सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) हे आपल्या पत्नासह वेलिंगटन (Wellington)
येथे एका कार्यमासाठी जात असताना 8 डिसेंबर रोजी भारतीय हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली होती.
यामध्ये बिपीन रावत त्यांची पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला होता.
वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हा अपघात झाला. दोन इंजिन असलेले IAF MI-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजले जाते.
परंतु हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली.
हे हेलिकॉप्टर सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे मुख्यत्वे वापरले जाते.

 

 

Web Title :- CDS Bipin Rawat | cds bipin rawat helicopter crash reason and big information came out report

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन प्लॅस्टिक पिशवीत चेहरा घालून खून, नातेवाईकांना मेसेज पाठवून आरोपी इंजिनिअर मुलाची आत्महत्या; पुणे शहरात खळबळ

 

Nawab Malik-NCB | ‘एनसीबीचा फर्जीवाडा सुरुच, भाजपचे मोठे नेते गृहमंत्रालयात करताहेत लॉबिंग’, कथित ऑडिओ क्लिप ऐकवली; नवाब मलिकांचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

 

Bharat Sasane | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड