Homeताज्या बातम्याCDS Bipin Rawat | बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कशामुळे झाला?...

CDS Bipin Rawat | बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कशामुळे झाला? एअरफोर्सच्या चौकशी समितीने दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter Crash) देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचं निधन झाले. या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्यासह 14 जणांचा मृत्यू (Death) झाला होता. या दुर्घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर (Security System) अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. ही दुर्घटना कशी झाली? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याचा उच्चस्तरीय तपासही (High Level Investigation) झाला. या तपासातून या दुर्घटनेचं कारण समोर आलं आहे. 8 डिसेंबर 2021 रोजी हा अपघात झाला होता. यामध्ये रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

 

 

सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनाप्रकरणी एअरफोर्सच्या चौकशी समितीचा (Air Force Inquiry Committee) प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. एअरफोर्सच्या चौकशी समितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड (Technical Failure) झालेला नव्हता. अथवा कट, किंवा दुर्लक्ष हे अपघाताचं कारण नाही. अचानक पणे बदलेल्या क्लायमेटमुळे (Climate) हेलिकॉप्टर चा मार्ग भटकला अन् त्यामुळेच हा अपघात झाला. एअरफोर्सच्या चौकशी समितीने बारकाईने याचा अभ्यास केला आहे. यामध्ये फ्लाइट डाटा रिकॉर्डर (Flight Data Recorder) आणि कॉकपिट व्हाईस रिकॉर्डर चे (Cockpit Voice Recorder) विश्लेषण पूर्ण झालं. याप्रकरणाची कोर्ट ऑफ इन्क्वायरी मध्ये (Court of Inquiry) रिकॉर्डिंग चे विश्लेषण करण्यात आले.

 

 

 

नेमकं काय घडलं?
सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी 8 डिसेंबरला तामिळनाडूला गेले होते.
वेलिंग्टन (Wellington) येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज (Armed Forces College) आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचे लेक्चर होते.
तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर (Coonoor) येथे येत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.
कुन्नूर येथून रावत हे दिल्लीला रवाना होणार होते. मात्र, कुन्नूरला पोहचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.

 

 

Web Title :- CDS Bipin Rawat | cds gen bipin rawat chopper crash tri services court inquiry ruled out mechanical failure sabotage IAF

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | मोदी सरकार किमान मूळ पगार 18,000 वरून वाढवून करणार 26,000 रुपये, लवकरच होऊ शकते घोषणा

 

Corona in Mumbai | मुंबईकरांना मोठा दिलासा ! नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट

 

Modi Government | महाराष्ट्र सरकारला खोटे ठरवण्याचा डाव? मोदी सरकारकडून ‘ते’ वृत्त चुकीचं असल्याचा खुलासा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News