CDS Bipin Rawat | हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपिन रावत शहीद; मधुलिका बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू

कन्नूर : वृत्तसंस्था – संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर कोसळल्याने (helicopter crash) संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळेलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे ही दुर्घटना झाली आहे. या दुर्घटने प्रकरणी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश देण्यात आले आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलगिरी पर्वत रागांमध्ये आज दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली (Army Helicopter Crash) आहे. प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला (Tamil Nadu) गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज (Armed Forces College) आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह जवळपास 14 जण होते. हवाई दलाचे Mi-17V5 हेलिकॉप्टर होते.

 

कोण आहेत बिपिन रावत?
बिपिन रावत हे देशातील पहिले सीडीएस अधिकारी म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक होते. तिन्ही सैन्यामध्ये समन्वय साधण्याचे अति महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होते.

 

बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. त्यांचे वडील एलएस रावत हे देखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून ओळखले जात होते. त्यांचे बालपण सैनिकांमध्ये गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिमल्यात झाले. त्यानंतर डेहराडून येथील इंडियन मिलिट्री अकादमीत (Indian Military Academy) प्रवेश घेतला.

 

अनेक पदकांनी सन्मानित

सैन्यात असताना बिपिन रावत यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
लष्करात अनेक पदकं मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक,
अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

Web Title :- CDS Bipin Rawat | Indian Air Force announces the demise of CDS General Bipin Rawat along with 12 others in chopper crash

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Income Tax Department | गुजरातमधील उद्योगावर प्राप्तिकर विभागाचा छापा; 500 कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस

Palak Tiwari | डिसेंबरच्या थंडीत श्वेता तिवारीची मुलगी पलकने वाढवला इंटरनेटवर ‘पारा’, बोल्ड फोटो पाहून लोक झाले हैराण

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 80 वर्षीय आईला 60 वर्षाच्या मुलाकडून अन् सुनेकडून काठीने मारहाण, हात फॅक्चर

Army Helicopter Crash | सीडीएस बिपीन रावत यांना घेवुन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश, पत्नी ‘मधुलिका’ यांच्यासह 9 जण करत होते प्रवास; 4 जणांचे मृतदेह आढळले (व्हिडीओ)

Udayanraje Bhosale | खा. उदयनराजे भाजपलाही नकोसे?; सातारा जिल्हाध्यक्षांच्या विधानामुळं चर्चेला उधाण

Pune Crime | कुबेर शक्ती मल्टी पर्पज इंडिया निधी लिमीटेडकडून 100 जणांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून शिरीष खरात याला नाशिकहून अटक