बिपीन रावत यांनी CDS चा पदभार स्विकारला, असं दिसतं त्यांचं कार्यालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जनरल बिपिन रावत यांनी बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) ची जबाबदारी सांभाळली. त्यांचे कार्यालय दक्षिण ब्लॉक मध्ये आहे. यावेळी जबाबदारी स्वीकारताना जनरल बिपिन रावत यांच्यासह कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. त्यांचे काका कर्नल एसपीएस परमार यांनी एका मुलाखतीत जनरल रावत यांच्या यशाचे रहस्य सांगितले.

कर्नल एसपीएस परमार म्हणाले की, बिपिन रावत हे लहानपणापासूनच कष्ट करीत होते. ते लष्करी वडिलांचे लष्करी पुत्र आहे. त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाचे अनुसरण केले. मी त्यांना नेहमीच प्रामाणिकपणाने काम करण्याचा सल्ला देतो.

बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचा पदभार स्वीकारल्यानंतर जनरल बिपिन रावत यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जनरल रावत यांना यशस्वी कारभारासाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून जनरल बिपिन रावत यांचे कौतुक केले.

पीएम मोदी म्हणाले की, जनरल बिपिन रावत हे एक हुशार अधिकारी आहेत. त्यांनी संपूर्ण उत्साहाने देशाची सेवा केली आहे. याआधी 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी तीन्ही सैन्यदलांत समन्वय साधण्यासाठी आणि लष्करी दलांचे आधुनिकीकरण करण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची स्थापना करण्याची घोषणा केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?