पाकिस्तानच्या कुरापीत सुरुच ; सीमारेषेवर पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन

श्रीनगर : वृत्तसंस्था – भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी कॅम्प उध्वस्त् करत 350 दशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पुलवामा हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारताने दिले आहे. शिवाय आपल्याकडे असणाऱ्या युद्ध क्षमतेची झलक यातून दाखवली आहे. असे असतानाही पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला होता. हवाई हद्दीत त्यांच्या विमानांनी घुसखोरी केली होती. यांना त्या कारणाने पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असल्याचे दिसत आहे. यानंतर आता पुन्हा पाकिस्तानने कृष्णा घाटी, पुंछ आणि मेंधर या ठिकाणी युद्धबंदीचा भंग केल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान एकीकडे पाकचे पंतप्रधान शांततेचा आव आणत चर्चा करू म्हणत आहेत आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या सैन्याकडून सीमारेषेवर कुरापती सुरुच आहेत असा विराेधाभास दिसत आहे. कारण नुकतीच याबाबत माहिती समोर आली आहे. सीमारेषेवरील काही ठिकाणी पाकिस्तानने युद्धबंदीचा भंग केला आहे. त्यामध्ये कृष्णा घाटी, पुंछ आणि मेंधर या ठिकाणांचा समावेश आहे.

‘आम्ही चर्चेस तयार आहोत’ : पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तान हे दोघेही सशस्त्र देश आहेत. युद्धामुळे कुणाचेही भले होणार नाही. त्यामुळे आपल्याला चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावे लागतील, आम्ही चर्चेस तयार आहोत, असा दावा इम्रान खानने केला आहे. भारताने काल केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली आहे. मात्र युद्ध हे कुठल्याही गोष्टीचा पर्याय ठरू शकत नाही. भारत आणि पाकिस्तान दोघेही शस्त्रसज्ज देश आहेत. त्यामुळे युद्ध झाल्यास गंभीर परिणाम होतील. त्यामुळे दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही, असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.