पुण्यातील न्यू इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये (NEMS) ‘बालदिन’ उत्साहात साजरा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील न्यू इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये (NEMS) बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेतील मुलांसाठी फनफेअरचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विविध खेळांचे आयोजन केले होते. मुलांनीही याचा मनसोक्त आनंद घेतला. यावेळी न्यू इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये (NEMS) मधील प्री प्रायमरी सेक्शनच्या इंचार्ज शिल्पा कुलकर्णी यांनी पोलीसनामाशी संवाद साधला.

आपली भावना मांडताना शिल्पा कुलकर्णी म्हणाल्या, “आज बालदिनानिमित्त आम्ही मुलांसाठी शाळेत फनफेअरचं आयोजन केलं आहे. यानिमित्त शिक्षकांनी मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन केले. मुलांनी मोठ्या प्रमाणात विविध खेळांमध्ये सहभाग घेतला आहे. पालकांनीही विविध खाद्यपदार्थांचे आणि टॅटूटे स्टॉल लावले आहेत. मुलांनीही आज मनुरादपणे बालदिनाचा आनंद घेतला. आम्हालाही या गोष्टींचा आनंद आहे की, आम्ही शाळेतर्फे मुलांसाठी एक आगळावेगळा प्रयोग करू शकलो.”

शाळेतील लहान मुलांनी खाद्यपदर्थांचा आणि टॅटू स्टॉलचा आनंद लुटला. आयोजित केलेल्या विविध खेळांचाही लहान मुलांनी आनंद घेतला. खेळासाठी मुलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावेळी सर्व मुलं खूप उत्साही आणि आनंदी दिसून आले.

Visit : Policenama.com