नीरा येथील कन्या शाळेत संविधानदिन साजरा

नीरा : पोलिसनामा ऑनलाइन – नीरा (ता.पुरंदर) येथील सौ लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्या मंदिरामध्ये संविधानदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पुजन प्राचार्या सुवर्णा बोडरे करण्यात आले. नीरा येथील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्या मंदिरामध्ये संविधानदिना निमित्त प्राचार्या सुवर्णा बोडरे , पर्यवेक्षक उत्तम काळे यांसह सर्व सेवक व विद्यार्थिनींंनी सामुदायिक संविधानाचे उद्दीशिकेचे वाचन केले.

उपशिक्षिका जस्मिन सय्यद यांनी आपल्या भाषणातून डॉ.आंबेडकर यांच्या कार्याचा आलेख मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणले जाते त्यांच्या अथक प्रयत्नानंतर संविधानाचा मसुदा विधानसभेत सादर करण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान समितीने संविधानाचा स्वीकार केला त्यामुळे हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.सानिका कदम व सानिया कुदळे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संविधान दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा या सारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला .या कार्यक्रमाचे नियोजन शितल शिंदे यांनी केले होते .याप्रसंगी हनुमान नाझरे, ज्ञानेश्वर जाधव ,अशोक कोलते, अमर नांदखिले , वैशाली पाटील व सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.अशा प्रकारे विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा करण्यात आला. सुत्रसंचालन वैभवी गणेशकर हिने केले. आभार अश्विनी खोपे यांनी मानले.

Visit : Policenama.com