‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने बालिका दिन साजरा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय बालिका दिन 2008 साली महिला व बालविकास मंत्रालयाने सुरवात केली असून बालिकांन बाबत समाजा मध्ये असणारा भेदभाव दूर व्हावा हा एक मेव शासनाचा उद्देश असून बेटी बचाव बेटी पढाव हा शासनाने नारा देत समाजा मध्ये मुलींच्या शैक्षणिक विकासा बाबत जनजागृती केली.

मुरबाड पंचयातसमिती अंतर्गत दि 24 जनेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन या निमित” महिला व बाल विकास विभागाने “प्रत्येक गावामध्ये मुलींच्या नावाने वृक्षारोपण करून बेटी बचाव बेटी पढाव हा नारा देत मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला.

मुलगी जन्मा येण्या अगोदर तिची गर्भांशयातच तिची हत्या केली जात असल्याचा घटना लक्षात घेऊन या काही ठिकाणी घडत असलेल्या समाज विकृत घटना लक्षात घेऊन हे कुठेतरी थांबले पाहिजे एवढेच नाही तर मुलांन प्रमाणे मुलींनाही उच्च दर्जेदार शिक्षण दिले गेले पाहिजे याचे महत्व बालिका दिनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना महत्त्व पटवून सांगण्यात आले.

बालविकास दिनी मुलींच्या हस्ते वृक्षारोपन करून मुलींन सोबत पालकांच्या उपस्थितीत झाडे लावण्यात आली. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी कल्पना देशमुख, परिसरातील मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका यांनी मुरबाड तालुक्यातील गावोगावी भेट देऊन बालिका दिनाचे महत्व पटवून जनजागृती केली यावेळी गावातील सरपंच व प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.