विविध उपक्रमांनी आमदार चाबुकस्वार यांचा वाढदिवस साजरा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

शिवसेनेचे पिंपरीचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचा वाढदिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी काल साजरा करण्यात आला.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a33b69de-ad0d-11e8-878a-ad4b65c2df67′]

मोहननगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. वाढदिवसानिमित्त फुगेवाडी येथील जयमहाराष्ट्र मित्र मंडळाला पाच लाख रूपये किंमतीची कुस्ती मॅट आमदार चाबुकस्वार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने नेत्रतपासणी शिबिर व चष्मेवाटप कार्यक्रम घेण्यात आला. याचे आयोजन बाबा कांबळे यांनी केले होते. शिवसेनेच्या फुगेवाडी शाखेच्या वतीने गरीब विदयार्थ्यांना १० हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. विभागप्रमुख एकनाथ हाके, शाखाप्रमुख निलेश हाके यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. पुण्यातील खुद्दाम-ए-मिल्लत व आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार युवा मंचच्या वतीने मुस्लिम वधु-वर पालक परिचय मेळावा घेण्यात आला. मिलिंदनगर येथील जामा मस्जिद येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

मुक्‍ता दाभोळकर, जितेंद्र आव्‍हाड होते निशाण्यावर; एटीएसचा धक्‍कादायक खुलासा 

दापोडी व फुगेवाडी येथील शिवसेना शाखेच्या अनाथ आश्रमात अन्नदान करण्यात आले. यामध्ये विनोद शिंदे, विकास गायकवाड, ॲड. अजित बोराडे, स्वप्नील शेवाळे यांनी सहभाग घेतला.

Please Subscribe Us On You Tube