सकल मराठी समाजाच्या वतीने समतावादी राज्याभिषेक दिन साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

संभाजी महाराजांच्या प्रेरणेतून शिवरायांनी समतावादी राज्यभिषेक २४ सप्टेंबर १६७४ साली करवून घेतला. हाच समतेचा धागा पकडून २४ सप्टेंबर १८७३ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची सुरुवात केली. तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी २४ सप्टेंबर १९२४ साली बहुजनांच्या हक्काचे समता सैनिक दलाची स्थापना केली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bf57783b-c4b7-11e8-bbfc-333c84342ced’]

महापुरुषांनी समतेचा संदेश समाजात रुजविण्यासाठी सकल मराठी समाज आणि समता सैनिक दलाच्या वतीने पुण्यामध्ये समतावादी राज्याभिषेक दिन २४ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. समतावादी राज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन पुणे स्टेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातसून अंजली आंबेडकर व संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, सकल मराठी समाज समन्वयक राजेश खडके, भीम साम्राज्य संघटनेचे गणेश भोसले, प्रचंडगड परीवाराचे वंशज अंकुश गायकवाड, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रफुल्ल गुजर, वतन बचाओ आंदोलनाचे सुभाष जाधव, कबीर विचार मंचाचे शरद गायकवाड, सम्राट अशोक सेनेचे विनोद चव्हाण, FBS ग्रुप विमाननगरचे फिरोजभाई शेख, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते मुरलीधर जाधव, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शुभम चव्हाण, भारिपचे संदीप चौधरी, मनोज खंडागळे, भीम आर्मीचे दत्ता पोळ, भिमसेवा प्रतिष्टानचे सिद्धांत सुर्वे, उपस्थित होते.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c4a50b53-c4b7-11e8-b817-916c66bdb1e5′]

समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी समतावादी राज्याभिषेक, सत्यशोधक समाजाची स्थापना, समता सैनिक दल स्थापना, भीमा कोरेगाव भेट, चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन अशा समतावादी घटनांची माहिती देणारे फलक उभारण्यात आले होते.

जाहिरात