जिनिअस माईंड्स प्री स्कूल येथे चिमुकल्यांचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

आंबेगाव पठार : पाेलीसनामा ऑनलाईन

हाती तिरंगा…. ‘भारत माता कि जय, वंदे मातरमचा जयघोष…… चेहऱ्यावर तिरंग्याच्या छटा…. आंबेगाव पठार येथील इरा फाऊंडेशन यांचे ‘जिनिअस माईंड्स प्री स्कूल’ येथे स्वातंत्र्यदिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी, झाशीची राणी, सुभाषचंद्र बोस, भगत सिंग आदि विविध स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषा परिधान करून स्पर्धेत सहभाग घेतला. तसेच देशभक्तीपर गीत आणि कु.अनुष्का हिने देशभक्तीपर नृत्य देखील सादर केले.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a914e254-a086-11e8-b67a-03a53f901ac6′]

यावेळी शाळेच्या संचालिका सौ. हर्षदा प्रसाद वाघोलीकर व सौ. गितांजली अभिजित मुजुमले यांसह इतर शिक्षकवृंद उपस्थितीत होते.

देशभर ७२ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात येत आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी चिमुकल्यांनी सुध्दा आपला सहभाग दाखवला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी, झाशीची राणी, सुभाषचंद्र बाेस, भगत सिंग आदी स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषा परिधान करून या चिमुकल्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे.