हवेत गोळीबार करुन नवीन गाडीचे सेलिब्रेशन, निवृत्त जवान गजाआड

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन कार खरेदी केल्याच्या आनंदात एका निवृत्त जवानाने शिर्डीत येऊन गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या या जवानाविरुद्ध शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन गजाआड केले. ही घटना बुधवारी (द.५) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. पुष्पराज रामप्रसाद सिंग असे अटक करण्यात आलेल्या मध्यप्रदेशातील निवृत्त जवानाचे नाव आहेत.

लष्करातून सेवा निवृत्त झालेल्या रामप्रसाद सिंग (वय ३८ ) या जवानाने नवी कोरी कार खरेदी केली असून तो भाऊ व मित्रासोबत साई दर्शनास बुधवारी संध्याकाळी शिर्डीत आला होता. त्यांनी साई मंदिराच्या जवळ पालखी रोड वर हॉटेल कौशल्या येथे खोली बुक केली होती. साईबाबांचे दर्शन आटोपून त्यांनी नव्या कारची पूजा केली. रात्रीचे जेवण आटोपून ते सर्वजण हॉटेलवर परतले. हॉटेल परिसरात कार उभी करून या जवणाने सोबत आणलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला आणि कार खरेदीचा आनंद साजरा केला. गोळीबाराचा आवाज झाल्याने हॉटेल व सभोतालचा परिसर हादरला. आणि एकच घबराट माजली.

पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले. पोलिसांनी या जवनास पकडले व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गोळीबार का केला असे पोलिसांनी त्याला विचारल्यावर नवीन गाडी खरेदी केल्याचा आनंद साजरा केला असे सांगितले अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात यांनी दिली. पोलीस उपाधीक्षक अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनीही या घटनेची गंभीर नोंद घेत सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. या जवनाकडे असलेली बंदूक ही परवानाधारक आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us