पोलिसांनी केलं ‘असं’, ‘सिंघम’ला सलाम ! निकालापुर्वीच राष्ट्रवादी व शिवसेनाचा जल्लोष, आमदारासह इतरांवर FIR (व्हिडिओ)

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या मतदानानंतर काही ठिकाणी अनेकांनी आपला विजय उत्सव साजरा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात निकालाआधीच फटाके फुटल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. कोकणात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विजयचा दावा करत फटाके फोडत जल्लोष साजरा केला.

दापोली मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांनी विजयाची मिरवणूक काढल्याने त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी आमदार संजय कदम यांना पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना थांबविण्याचे स्पष्ट बजावले. मात्र, कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव सुरुच होता.

आमदार संजय कदम खेड येथे आल्यावर कार्यकर्त्यांनी खेड ते भरणे नाका अशी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकारी प्रवीण पाटील यांनी कार्यकर्त्यांना संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले. त्यावर कार्यकर्त्यांनी त्यांना बाजूला काय सुरू आहे त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितली. त्यामुळे संजय कदम त्यांच्या पत्नी सायली कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके फोडले आणि आपला विजय साजरा केला. यावेळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. योगेश कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र आहेत. निवडणुकी आधीच खेडमध्ये विजयाची मिरवणूक निघू लागल्याने आणि कार्यकर्त्यांच्या अती उत्सहामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Visit : Policenama.com