सॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी, रवीना टंडनचा अधिकाऱ्यांवर ‘हल्लाबोल’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर बॉलीवूड सेलिब्रिटीचं ड्रग्स चॅट समोर येऊ लागले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये अनेक लोकांची चौकशी झाली आहे तर अनेक मोठ्या स्टार्सची चौकशी होणार आहे. या मध्ये सिनेमा आणि टीव्हीवरील अनेक कलाकारांची नावे समोर येत आहेत. यावर रविना टंडन यांनी सुद्धा ट्विट केले आहे. त्यांना असं वाटत आहे ड्रग्स प्रकरणात सेलिब्रिटी सॉफ्ट कॉर्नर टार्गेट आहेत. हा तपास फक्त फिल्म इंडस्ट्री पुरता मर्यदित राहू नये. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिलं आहे कि कोणत्याही अधिकाऱ्याच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्स सप्लाय होऊ शकत नाही. जे मोठे मासे आहेत त्यांना कोणीही जाब विचारत नाही.

जर एखादा पत्रकार स्टिंगमधून एका ड्रग सप्लायर पर्यंत पोहोचू शकतो तर मग अधिकाऱ्यांना याबाबत कसं काय माहित नसतं ? सेलेब्रिटी सॉफ्ट टार्गेट आहेत. रविना टंडन यांनी आपल्या दुसऱ्या ट्विट मध्ये लिहिले कि, संपूर्ण देशभरात ड्रग्स विरोधी मोहीम चालवण्याची गरज आहे ड्रग्स सप्लायर्स शाळा, कॉलेज, आणि पब्सच्या बाहेर फिरत असतात, ड्रग्स इंडिकेटमध्ये अनेक शक्तिशाली अधिकारी सहभागी असतात. जे पैसे घेऊन गप्प बसतात आणि तरुणांची आयुष्य उद्धवस्त होऊ देतात. हे सगळं मुळापासून संपवा, आणि फक्त इथेच थांबू नका तर संपूर्ण देशात ड्रग्स विरोधी मोहीम सुरु करण्याची घोषणा करा.

या अगोदर ड्रग्स चॅट मध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची नावे आल्यानंतर रवीना टंडनने लिहिले होते कि, आता सफाईची वेळ आली आहे, कौतुकास्पद पाऊल. आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांची मदत केली पाहिजे .इथूनच सुरुवात करा आणि दुसऱ्या क्षेत्राकडे पण वळा. जे दोषी आहेत त्यांना शिक्षा द्या. याचा फायदा घेणार मोठे लोक आहेत ते आता निशाण्यावर आहेत जे दुसऱ्यांचा विचार न करता त्यांची लाईफ खराब करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like