सोलापूर : सिमेंट मिक्सर – कारचा भीषण अपघात, 5 जागीच ठार तर एक जखमी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथे सिमेंट मिक्सर आणि कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात होऊन त्यात ५ जण जागीच ठार झाले असून एक जखमी झाले आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांचे वैराग येथील त्यांचे नातेवाईकांचा अपघातात मृत्यु झाला. ओमप्रकाश शेटे नातेवाईक हे अकलूजच्या दिशेने कारने जात होते. त्यावेळी सिमेंट मिक्सरचा कंटेनर याने समोरुन येऊन कारला जोरात धडक दिली. त्यात कारचा चेंदामेंदा झाला असून अपघातानंतर कंटेनरही रस्त्याच्या कडेला उलटला आहे. ही धडक इतकी जोरात होती की, त्यात कारमधील लोक जागीच ठार झाले आहे.