…अन् स्मशानभूमी बनतेय दारूचा अड्डा

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) –  शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई येथील स्मशानभूमी सध्या दारुड्यांनी दारूअड्डा बनवली असून दिवसाढवळ्या येथे दारुड्यांच्या मैफिली रंगताना दिसत आहे. लाखो रुपये खर्च करून एखादया बागेसारखी शुशोभीकरण बनवलेली ही स्मशानभूमी आहे.

माञ या वडगाव रासाई येथील स्मशानभुमीत फेरफटका मारला असता आजूबाजूला देशी,विदेशी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसत आहे. तर दारू पिणारे बागेत बसल्यासारखे गोल रिंगण करून बसताना दिसतात.

स्मशानभूमी हीअंत्यविधी आणि दशक्रिया विधीसाठी सुशोभित केली असताना सध्या माञ दारू पिणाऱ्यांचे हक्काचे स्थान होत आहे.

वडगाव रासाई येथील बाजार स्थळापासून हाकेच्या अंतरावर ही स्मशानभूमीआहे. स्मशानभुमीत मोठी झाडे असून बसण्यासाठी बाकांची उत्तम सोय केलीआहे. या सर्व सोयी सुविधाचा गावातील तळीरामांनी अगदी पुरेपूर फायदा घेतलेला दिसून येत असून गावातील नागरिकांची ना पोलिसांची कसलीही भीती या दारुड्यांना नाही.

दिवसभर केव्हाही आणि कितीही वेळ येथे दारू पिणे एन्जॉय केले जात असून पोलिसांना याची खबर नाही. गेले अनेक दिवस हा प्रकार चालू असून. तत्काळ यावर कारवाई होणे गरजेचे असून तळीरामांची तळी भरण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.