२०२१ मध्ये ‘जनगणना’ संकलन ऑनलाइन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात दर दहा वर्षांनी लोकसंख्या मोजणी म्हणजेच जनगणना केली जाते. मात्र २०२१ मध्ये हि जनगणना हि ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. जनगणनेसाठी माहिती संकलनाच्या पद्धतीत काही बदल करण्यात येणार आहेत.

यासाठी रंगीत तालीम देखील घेतली जणार आहे. यासाठी भारताचे महानिबंधक तथा जनगणना आयुक्तांच्या कार्यालयामार्फत देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच ‘जनगणना-२०२१’ची तयारी सुरू झाली करण्यात आली आहे. यासाठी देशभरातील काही निवडक जिल्ह्यात सर्वे करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील मार्ग ठरवला जाणार आहे.

जनगणना संचालक रश्मी झगडे यांनी याविषयीची माहिती दिली आहे. पुण्यातील यशदा संस्थेत ३ ते ११ जून या कालावधीत प्रशिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते, यावेळी त्यांनी हि माहिती दिली. २०२१ मधील जनगणनेत देशात प्रथमच ऑनलाईन संकलन करण्यात येणार आहे. यामुळे देशभरातील संशोधक आणि सर्वांनाच या माहितीच उपयोग होईल. त्यामुळे या माहितीचा उपयोग शासनाला देखील आपली धोरणे तसेच योजना ठरवण्यात होईल.

दरम्यान, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जनगणना चाचणीचे प्रत्येक टप्प्यात बिनचूक काम झाल्यास प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पद्धत सुनिश्चित करणे शक्य होणार आहे. त्यामुळे जनगणना ऑनलाईन करणे सर्वांच्याच फायद्याचे आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

लाइफ सपोर्ट सिस्टिमवर व्यक्ति जिवंत राहू शकते काय ?

जेवल्यानंतर तात्काळ करु नका ‘ही’ कामे

श्वास घेताना आपण करतो ‘या’ सामान्य चुका,आयुष्यमान होते कमी

भाज्या बॉइल करुन खाण्याचे आहेत अनेक फायदे

Loading...
You might also like