धक्‍कादायक ! अंमली पदार्थ खाऊ घालून तृतीय पंथ्याने युवकाचा कापला ‘प्रायव्हेट पार्ट’

मुरादाबाद : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना घडली आहे. तृतीयपंथी व्यक्तीने एका युवकाला अंमली पदार्थ खाऊ घालून युवकाचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना मुरादाबाद जिल्ह्यातील अगवानपुर येथे घडली आहे. २५ वर्षीय युवक बिलालचे तृतीयपंथी व्यक्ती मनोजकुमार उर्फ पायलशी बऱ्याच काळापासून मैत्रीचे संबंध होते. युवकाने पायलला काही पैसे दिले होते. गुरुवारी तो पैसे घेण्यासाठी पायलकडे गेला होता.

जेव्हा युवक बिलाल पायलच्या घरी गेला तेव्हा पायलने त्याला जेवणातून अंमली पदार्थ खाऊ घातले. त्यानंतर पायलने बिलालला इंजेक्शन दिले. बेशुद्ध अवस्थेत गेलेल्या बिलालचा पायलने प्रायव्हेट पार्ट कापला. यानंतर बिलाल त्याच्या घरी धावत धावत आला आणि त्याच्या घरच्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

बिलालची स्थिती सध्या गंभीर आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, प्लास्टिक सर्जरीसाठी बिलालला दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन्सचे पोलीस निरीक्षक सजीव कुमार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी म्हटले की, घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like