104 वर्षाच्या वृध्दाचा मृत्यू, तासाभरात 100 वर्षाच्या पत्नीनं प्राण सोडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयुष्यातील काही जोड्या या देवचं बनवतो असे अनेकदा म्हंटले जाते याचाच प्रत्येय येणारी घटना तामिळनाडू मधील पदुकोट्टई जिल्ह्यात घडली आहे. या जिल्ह्यातील एका 104 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीचे निधन झाले. याचा धक्का त्यांच्या पत्नीला सहन झाला नाही आणि एका तासांमध्येच 100 वर्षाच्या म्हातारीने देखील आपला प्राण सोडला.

अंगलगुडी भागातील 104 वर्षांच्या वेत्रीवेलचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या एका तासानंतर 100 वयाच्या त्यांच्या पत्नीने सुद्धा आपले प्राण सोडले. त्यांचे नातेवाईक सांगतात की, दोघांच्या लागणाला 75 वर्ष पूर्ण झाले होते आणि हे दोघे लहानपणापासून एक मेकांना पूर्णपणे ओळखत होते. सोमवारी वेत्रिवेल यांच्या छातीत अचानक दुखू लागले तेव्हा त्यांच्या नातवाने त्यांना दवाखान्यात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पत्नी पिचाई ने जेव्हा पतीचे मृत शरीर पाहिले तेव्हा तिला हे सहन झाले नाही ती बेशुद्ध झाली. नातवांनी जेव्हा तिला उठवण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा तिचेही प्राण गेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

एल कुमरवेल यांनी सांगितले की, आजोबांच्या मृत्यूच्या एक तासाच्या आधीच आजीने सुद्धा हे जग सोडले. या म्हाताऱ्या जोडप्याला पाच मुलं आणि एक मुलगी तसेच 23 नातू आणि अनेक पंतु असा भला मोठा परिवार होता. आजी आजोबांचे प्रेम हे आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी होते असे त्यांचे कुंटुंबीय सांगतात.

 

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like