केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा अपघात, पत्नी विजया नाईक यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय आयुष मंत्री श्रीपद नाईक यांच्या कारचा सोमवारी उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा जवळ अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री नाईक हे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचे निधन झाले आहे.

दरम्यान, श्रीपाद नाईक यांची तबियत आता स्थिर आहे. त्यांच्या पत्नीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.