जगातील ‘या’ लहान देशानं खरेदी केलं सर्वात जास्त सोनं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील अनेक देशांच्या सेंट्रल बँकांकडून सोन्याच्या मागणीत वाढ झाली असून एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये सोन्याच्या मागणीत आठ टक्क्यांनी वाढ झाली असून ती आता ११२३ टनांवर गेली आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीत हि माहिती समोर आली आहे. यामध्ये पोलंडने सर्वात जास्त सोने खरेदी केले असून त्यांनी या तिमाहीत १०० टन सोने खरेदी केले असून रशिया या सोने खरेदीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

वर्ल्ड गोल्ड काउंसिलने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षीच्या तिमाहीत सोन्याची मागणी हि १०३८ टन इतकी होती. ती या वर्षी वाढून ११२३ टनांवर गेली आहे. याच कालावधीत सोन्यावर आधारित ईटीएफमध्ये देखील वाढ झाली असून ६७ टनाने वाढ झाली असून २५४८ इतके सहा वर्षाच्या उच्चस्तरावर पोहोचले आहे. सोन्याच्या विटा आणि शिक्क्यांच्या मागणीत १२ टक्क्यांनी घट दिसून आली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ झाली असून यामध्ये २ टक्क्यांची वाढ झाली असून हि ५३१ टनांवर गेली आहे.

दरम्यान, भारतातील सणांचे दिवस आणि भारतीय बाजारात पैश्यांची असणारी तेजी हे मागणी वाढण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर भारतात मोठ्या प्रमाणात नागरिकांना सोन्याची असणारी आवड हे देखील एक मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –